मुंबई दि.१० एप्रिल
मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून प्रामुख्याने पुढे आलेल्या आणि सध्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या सहकाऱ्याने एक धक्कादायक माहिती उघड केली असून डॉ. नरेंद्र काळे असे त्यांच्या सहकाऱ्याचे नाव आहे डॉ. नरेंद्र काळे महाराष्ट्र राज्य दंतपरिषद, मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यात त्यांनी लिहले आहे की
गुणरत्नाचे ‘अवगुणं‘
गुणरत्नांचा थोडा सहवास आम्हाला लाभला. मी शिक्षण घेतलेल्या शासकीय दंत महाविद्यालयातूनच हे महाशय डेंटिस्टझाले. औरंगाबाद च्या शासकीय दंत महाविद्यालयात प्रथम वर्ष परीक्षेत सलग चार वेळा ‘ गुणवत्ता पुर्ण नापास’ होण्याचा पराक्रम केल्या बद्दल त्यांना दंत वैद्यकीय शिक्षणापासून Debar (प्रतिबंध) करण्यात आला. त्यानंतर गुणरत्नांनी त्यांच्या गुणांचे प्रदर्शन करत चित्र विचित्र आंदोलने केली. हि आंदोलने जाणून घेण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद घाटी परीसरात शिक्षण घेतलेल्…