Home जिल्हा सट्टा खेळण्यासाठी सासऱ्याने पैसे न दिल्याने पोलीस असलेल्या जावयाने उचलले टोकाचे पाऊल...

सट्टा खेळण्यासाठी सासऱ्याने पैसे न दिल्याने पोलीस असलेल्या जावयाने उचलले टोकाचे पाऊल सासू ,सासरे पत्नी वर चाकू हल्ला

नाशिक दि.१० एप्रिल
जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी वारंवार सासऱ्यांकडे पैशाची मागणी करून पैसे देत नसल्याने या पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी, सासू आणि सासऱ्यावर चाकू हल्ला केला. यानंतर संशयित आरोपी सूरज उगलमुगले फरार झाला आहे.

या हल्ल्यात सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.  सूरज उगलमुगले असे हल्ला करणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

संशयित आरोपी सूरज याच्या विरोधात यापूर्वी त्याच्या पत्नीने शहर हद्दीतील उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version