Home क्राईम आपली दुचाकी हरवलीय तर मग ही यादी पहिली का ? यात आपली...

आपली दुचाकी हरवलीय तर मग ही यादी पहिली का ? यात आपली दुचाकी असू शकते

अहमदनगर दि.२४ डिसेंबर
अनेक वेळा दुचाकी चोरीला जाते आणि त्यानंतर दुचाकी चोर त्याचे काम झाले की दुचाकी कुठे तरी टाकून पळून जातो. त्यामुळे अशी दुचाकी बेवारस म्हणून पोलीस स्टेशनला जमा करण्यात येते. अहमदनगर जिल्ह्यात अशा दुचाक्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षे पडून आहेत. आपली गाडी चोरीला गेली तर ती सापडत नसल्याने दुचाकी मालकांनी केलेला कंटाळा त्यामुळे अशा अनेक बेवारस दुचाक्या पोलीस स्टेशन मध्ये पडून आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन मध्ये पडलेल्या दुचाक्यांची यादी जाहीर करण्यात आली असून बेवारस दुचाकींचे चेसी नंबर आणि गाडी नंबर जाहीर करण्यात आले आहेत. ज्या नागरिकांची दुचाकी चोरीला गेली असेल आशा गाडी मालकांनी संबंधित पोलीस स्टेशनची संपर्क करून आपली गाडी असल्याची खात्री करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गाड्या घेऊन जाव्यात असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय यादी👇

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version