Home राजकारण आमदार रोहित पवार रॉकिंग तर माजी मंत्री राम शिंदे शॉकिंग, भाजपला चारीमुंड्या...

आमदार रोहित पवार रॉकिंग तर माजी मंत्री राम शिंदे शॉकिंग, भाजपला चारीमुंड्या चित करत कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

कर्जत दि.१८ जानेवारी
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून कर्जत नगर पंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. मागील निवडणुकीत या नगरपंचायती वर तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा रोवला होता.

मात्र २०१९ च्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदार संघात बारामती वरून थेट एन्ट्री घेऊन रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना त्यांच्याच घरच्या मतदार संघात पराभूत करत आपला झंजावात सुरू केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे यांचे अनेक निकटवर्तीय भाजप सोडून राष्ट्रवादीत आले होते तर ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सुद्धा रोहित पवार यांनी भाजप म्हणजेच आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांना अस्मान दाखवले होते.

–               कर्जत नगर पंचायतीची निवडणूक माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती मात्र या निवडणुकीच्या सुरुवातीलाच एक जागा बिनविरोध करत आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले होते. यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत शहरात तळ ठोकून या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र कर्जतकरांनी माजी मंत्री राम शिंदे यांना आणि भाजपला नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

17 जागांपैकी अवघ्या दोन जागांवर भाजपला विजय प्राप्त करण्यात यश आले त्यामुळे आमदारकीच्या निवडणुकीनंतर सर्वात मोठा दुसरा धक्का आमदार राम शिंदे यांना कर्जत नगरपंचायतीच्या निकालानंतर लागला आहे.

विजयी उमेदवारांची यादी
1) छाया सुनिल शेलार 2) ताराबाई सुरेश कुलथे 3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे 4) भास्कर बाबासाहेब भैलूमे 5) उषा अक्षय राऊत 6) मोहिनी दत्तात्रय पिसाळ 7) नामदेव देवा राऊत 8) सुवर्णा रविंद्र सुपेकर 9) ज्योती लालासाहेब शेळके 10) संतोष सोपान मेहेत्रे 11) अश्विनी गायकवाड 12) रोहिणी सचिन घुले 13) मोनाली ओंकार तोटे 14) सतिश उध्दवराव तोरडमल 15) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल 16) अमृत श्रीधर काळदाते 17) खरात

एकूण बलाबल – राष्ट्रवादी १२, कॉंग्रेस 3 , भाजप २

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version