Home जिल्हा आरोग्य विभाग भरती फेर परीक्षा पुन्हा होणार, ‘त्या’ संवर्गातील परिक्षर्थी पुन्हा देऊ...

आरोग्य विभाग भरती फेर परीक्षा पुन्हा होणार, ‘त्या’ संवर्गातील परिक्षर्थी पुन्हा देऊ शकतात परीक्षा

मुंबई-

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत. अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या 11 संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाबतीत आणखी कोणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version