अहमदनगर प्रतिनिधी
त्रिपुरा मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना तसा या जगात कुठेतरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव ,अमरावती,नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या हजारोंच्या जनसमुदायाने रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांच्या दुकानांची नासधूस करत पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध भारतीय जनता पार्टीने करत या घटनेनंतर स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या निरपराध नागरिकांवर सध्या एकतर्फी कारवाई चालू असून दंगली करणार्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी ने केला आहे. पोलिसांनी पक्षपाती कारवाई न करता ज्या समाजकंटकांनी खोट्या क्लिप द्वारे अफवा पसरवून दोन समाजात दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर करावी करावी तसेच या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीयांच्या कडून चौकशी करण्यात यावी,दंगल घडवणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी दंगली मध्ये हात असलेल्या रझा अकादमीवर कायद्याने बंदी घालावी व स्वसंरक्षणासाठी उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर कारवाई बंद करण्यात यावी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी व त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहर अध्यक्ष भैय्या गंधे,माजी महापौर बाबासाहेब वकळे, दिलीप भालसिंग, गणेश भालसिंग, मनोज कोकाटे, बापू बेरड, भाऊसाहेब काळे, सागर पालवे ,अमोल सगडे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते