Home क्राईम कायद्या समोर सर्व सामान,वडील पोलीस तर मुलगा गुंडाच्या टोळीचा म्होरक्या अखेर पोलिसांनी...

कायद्या समोर सर्व सामान,वडील पोलीस तर मुलगा गुंडाच्या टोळीचा म्होरक्या अखेर पोलिसांनी केली सागर भांड टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

अहमदनगर- दि.१०
अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य 5 सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे,सहह्याक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सूर्यवंशी, विकास साळवे यांनी सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपासविशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील ,पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके करीत आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version