Home राजकारण कोल्हापूर उत्तर मतदार संघ मतमोजणी सुरू तिसऱ्या फेरी अखेर मविआच्या जयश्री जधाव...

कोल्हापूर उत्तर मतदार संघ मतमोजणी सुरू तिसऱ्या फेरी अखेर मविआच्या जयश्री जधाव इतक्या मतांनी आघाडीवर

कोल्हापूर दि. १६ एप्रिल

जसा जसा उन्हाळ्याचा पारा चढत चालला आहे त्याच प्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने राजकारणाचा पारा वाढवला होता. आज त्यात मतदारसंघाचा निकाल आहे. जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वात प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी झाली आणि या मध्ये मविआच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती
पोस्टल मतदान
जयश्री जधाव –4856 
सत्यजीत कदम –2712
दुसरी फेरी
जयश्री जधाव10371
सत्यजीत कदम5513

तिसरी फेरी

जयश्री जधाव– 15299
सत्यजीत कदम- 7798

आघाडीजाधव जयश्री

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version