Home राजकारण कोल्हापूर उत्तर मतदार संघ मतमोजणी सुरू मविआ आघाडीवर

कोल्हापूर उत्तर मतदार संघ मतमोजणी सुरू मविआ आघाडीवर

कोल्हापूर दि. १६ एप्रिल

जसा जसा उन्हाळ्याचा पारा चढत चालला आहे त्याच प्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने राजकारणाचा पारा वाढवला होता. आज त्यात मतदारसंघाचा निकाल आहे. जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वात प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी झाली आणि या मध्ये  मविआ च्या जयश्री जाधव आघाडी वर आहेत.

मविआ 4856 भजाप 2712

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान पार पडलं होतं. आज कोल्हापूरकरांना या बहुचर्चित जागेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version