Home Uncategorized खुशखबर नगर शहरातील कायनेटिक कंपनीत इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती !

खुशखबर नगर शहरातील कायनेटिक कंपनीत इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती !

अहमदनगर दि१८ फेब्रुवारी
लुना म्हणजे सर्वसाधारण कुटुंबाला परवडणारी दुचाकी काढून कायनेटिक कंपनीने सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलं होतं मागच्या पिढीने लुना चालवली नाही असं होणार नाही असा एकही व्यक्ती नगर शहरामध्ये मिळणार नाही.
कायनेटिक कंपनीने लुनची निर्मिती बंद केल्यानंतर आणि हळू हळू कंपनी स्थलांतर केल्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले होते जणूकाही नगर दौंड रोड वरील परिसराला मरगळ आल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली होती.


आता नगरकरांना नवीन खुशखबर आली असून
कायनेटिक ग्रीन च्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया यांनी एक ट्विट करत कायनेटिक कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादनाचा प्रकल्प अहमदनगर मध्ये सुरु केला आहे. अशी माहिती दिलीय या मुळे ऐतिहासिक नगर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

कायनेटिक कंपनीने लुनाची निर्मिती करून जसे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर केले होते त्याचप्रमाणे आता इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन करून सर्वसामान्यांना परवडेल अशी दुचाकी बाजारात आणावी अशी अपेक्षा नगरकर करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version