Home क्राईम गडचिरोली पोलिसांना मोठे यश २६ नक्षल्यांना घातले कंठस्नान नक्षलदलमचा मोठा नेता ठार...

गडचिरोली पोलिसांना मोठे यश २६ नक्षल्यांना घातले कंठस्नान नक्षलदलमचा मोठा नेता ठार झाल्याचा अंदाज ,तर तीन पोलीसही गंभीर जखमी

गडचिरोली प्रतिनिधी
शनिवारी सकाळी पोलीस आणि नक्षल्यावाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली असून या भीषण चकमकीत पोलिसांना 26 नक्षल्यवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता असून हे पोलिसांचे एक मोठं यश आहे गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती –कोटगुल घनदाट जंगल परिसरात शनिवारी सकाळी पोलीस-नक्षलमध्ये चकमक उडाली होती .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version