Home शहर गाणगापूरवरून देव दर्शन करून येत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला नगर शहरातील भाविकांचा...

गाणगापूरवरून देव दर्शन करून येत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला नगर शहरातील भाविकांचा समावेश

अहमदनगर दि ११ मार्च
अहमदनगर शहरातील  तपोवन रोडवरील एका कुटुंबातील काही सदस्यांचा अपघात झाल्याची माहिती हाती येत असून देव दर्शन करून येत असताना अककोलकोट गाणगापूर महामार्गावरील अफजलपूर गावाजवळ च्या कडेला असणाऱ्या झाडावर कार आढळून अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे या गाडीत तुन महिला एक तरुणी आणि एक पुरुष असे प्रवास करत होते.

MH 16 BH 5392 या चार चाकी गाडीत हे कुटुंब गाणगापूर येथून दर्शन घेऊन अहमदनगर कडे येत असताना  रस्त्याच्या कडेला असलेला खडीच्या ढिगाऱ्यावरून थेट ही चार चाकी झाडाला धडकली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

हा झाला त्या वेळी अहमदनगर शहरातील काही तरुण देव दर्शनासाठी गाणगापूर कडे जात होते त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याची गाडीची नंबर प्लेट पाहून या तरुणांनी त्याठिकाणी मदत कार्य सुरू केले होते यातील वैभव सांगळे यांनी स्थानिक  पोलिसांना आणि अहमदनगर मधील मित्रमंडळींना फोन लावून घटनेची माहिती दिली.

ही घटना कळताच अहमदनगर महानगरपालिकेचे  माजी नगरसेवक निखिल वारे यांनी तातडीने कुटुंबातील इतर व्यक्तींची संपर्क करून घटनेची माहिती कळवली तसेच गाणगापूर सोलापूर या ठिकाणी पोलीस आणि  डॉक्टरांशी संपर्कात आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version