अहमदनगर दि ११ मार्च
ज्या माणसाने आपल्या आयुष्याची ४० वर्षे प्रस्थापितांशी लढा दिला आणि सामान्य शिवसैनिक ते राज्य मंत्री आणि शिवसेना उपप्रमुख होण्यापर्यंत मजल मारली त्या धर्माभिमानी हिंदूधर्मरक्षक स्व . अनिलभैय्या राठोड यांचा फलक आपण जरूर फाडलात पण त्यांचे नगरकरांच्या हृदयात तहहयात स्थान जे आहे ते तुम्ही काढू शकणार नाहीत ते स्थान अढळच राहील असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी म्हण्टले आहे.
स्व. आमदार अनिल भैय्या राठोड यांची दिनांक १२ मार्च रोजी जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील चौकाचौकात त्यांना अभिवादन करणारे आणि त्यांच्या हिंदूधर्मरक्षक तसेच धर्माभिमानी कारकिर्दीची माहिती सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. शिवसेना पदाधिकारी, महापौर , नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. मोठ्या संख्येने हे फ्लेक्स लावल्याचे डोळ्यात खुपल्याने आणि किळसवाने जातीय राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या पिल्लावळीने हे फलक फाडण्याचे सत्र सुरु केले आहे. ही घटना नगर शहरातील शांतता भंग करण्यासाठी त्या समाज कंटकाने केली असून नगरचे राजकारण गढूळ करण्याचा हा गलिच्छ प्रकार आहे अशा शब्दात या घटनेचा गिरीश जाधव यांनी पत्रक काढून निषेध केला आहे.
आमचे दैवत असलेल्या अनिल भैय्या यांना महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे व माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी अभिवादन केलेला फलक स्टेट बँक चौकात काल लावण्यात आला . पण एक मागासवर्गीय महिला शिवसैनिक व शहराच्या प्रथम नागरिक सौ शेंडगे यांनी लावलेला फलक ज्यांच्या डोळ्यात खुपत होता त्यांनीच तो फाडला. हे कृत्य हीन जातीय राजकारनाचे उदाहरण आहे. असे त्यांनी या पत्रकात म्हंटले आहे.
स्व . आमदार अनिल भैय्या राठोड यांनी सलग ५ टर्म नगर शहराचे यशस्वी नेतृत्व केले. प्रत्येक वेळी गुंडशाही , धाक दडपशाही आणि दहशतीचा वापर करून राजकारण करणाऱ्याशी दोन हात करून शहर भयमुक्त ठेवण्यासाठी जे अहोरात्र झटले. अशा धर्माभिमानी सच्चा शिवसैनिकांने नगर करांच्या हृदयात असलेले स्थान हे कायमस्वरूपी आहे.
त्यांचा फलक तुम्ही फाडू शकता पण नगरकरांच्या मनामनात असलेली त्यांची प्रतिमा तुम्ही कशी मिटवणार . एखाद्याशी असलेले हाडवैर ती व्यक्ती गेल्यानंतर संपते असे म्हणतात. पण ती व्यक्ती गेल्यानंतरही त्या व्यक्तीविषयीचा द्वेष आणि मत्सर तुमच्या मनातून जात नसेल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही याला येणारा काळ हेच उत्तर आहे.
हिंदू धर्मरक्षक अनिल भैय्या यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आणि विचार आम्ही मिटवू देणार नाही आणि फलक फेडण्याचे शिंदड चाळे जर विरोधकांनी बंद केले नाही आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधितांना तात्काळ अटक झाली नाही तर त्याचा शिवसेना स्टाईल समाचार घेऊन बंदोबस्त केला जाईल असा इशारा जाधव यांनी दिला आहे