Home शहर गाणगापूर येथे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू...

गाणगापूर येथे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू सर्वजण नगर मधील रहिवासी

सोलापूर दि ११ मार्च

गाणगापूर अक्कलकोट महामार्गावर झालेल्या अपघाता मध्ये चार महिलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.

बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), त्यांच्या पत्नी छाया वीर (वय ५०), त्यांच्या दोन्ही मुली कोमल बाबासाहेब वीर आणि राणी बाबासाहेब वीर तसेच हिरा बाडे अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. जखमींमध्येममनी (वय ३) सायली वीर (वय १३) आणि चैताली (वय २४), यांचा समावेश आहे.

या भीषण अपघाता मध्ये गाडीतील पाचजण मृत्यू पावले असताना मात्र गाडीतील ममनी या तीन वर्षीय चिमुकलील साधे खरचटलेदेखील नाही. देव तारी त्या कोण मारी असंच या घटने वरून दिसून येतंय.

अहमदनगर मधील वीर कुटुंबातील व्यक्ती एमएच १६ बीएच ५३९२) या डस्टर गाडीत देवदर्शनाला गेले होते मात्र गाडीचे टायर फुटले आणि चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात मोटारीतील चार महिलांसह पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.जखमी झालेल्या तिघांना अफझलपूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अफझलपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version