Home जगाची सफर चीन मध्ये सापडला नवा विषाणू लॉकडाऊनची घोषणा

चीन मध्ये सापडला नवा विषाणू लॉकडाऊनची घोषणा

दिल्ली ११ मार्च

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता चीनमध्ये नवीन विषाणू आल्याच वृत्त धडकले आहे त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.

चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनच्या ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. या ठिकाणी नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचं संपूर्ण जगभर जाळं पसरलं. दरम्यान, कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूनं जगभरात दहशत निर्माण केलीय.

संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचं वृ्त्त समोर येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version