Home जिल्हा गुन्हेगारांबरोबर आता वन्य प्राण्यांपासून नागरीकांचे रक्षण करण्यासाठी पोलीस दलातील ‘या’ सिंघमने लावली...

गुन्हेगारांबरोबर आता वन्य प्राण्यांपासून नागरीकांचे रक्षण करण्यासाठी पोलीस दलातील ‘या’ सिंघमने लावली आपल्या प्राणाची बाजी , स्थानिक नागरिक पोलीस आणि वन विभागाच्या एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या अखेर पिंजऱ्यात

श्रीरामपूर –

पोलिसांकडे काय जबाबदारी येईल हे कुणीच सांगू शकत नाही “सदा रक्षणाय खल निग्रहणाय” हे ब्रीद वाक्य घेऊन पोलीस सेवेत भरती झालेल्या प्रत्येक पोलीसाला अनेक विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याप्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील श्रीरामपूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून अनेक वेळा पोलीस दलाच्या कामाची वेगळी चुणूक दाखवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील मोरगे वस्ती मध्ये एका बिबट्याने रविवारी सकाळी दर्शन दिल्याने एकच धावपळ उडाली होती.तर काही नागरिकांवर बिथरलेल्या बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये वृषभ निकाळजे हा बालक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. ही घटना कळताच पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली वनविभागाचे अधिकारी सुवर्णा माने या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचल्या होत्या. वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी बिबट्याला पकडताना बिबट्याने वन विभागाच्या आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.त्यामध्ये काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत मात्र सर्वांनी जीवावर उदार होऊन अखेर बिबट्याला जेरबंद केले.

काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका छोट्याशा गावात काही व्यक्तींना डांबून ठेवण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी सुद्धा उपाधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत हत्यारबंद असलेल्या इसमास शिताफीने पकडले होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला होता त्यानंतर आज बिबट्याला पकडताना स्थानिक नागरीक वनविभागाचे कर्मचारी यांच्या सोबत संदीप मिटके यांनी हुशारीने या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या रेस्क्यू टीम मध्ये उपवनसंरक्षक सुवर्णा माने, वनक्षेत्रपाल प्रतिभा सोनवणे तसेच संगमनेर उपवन विभागाची टीम यांनी सहभाग घेतला होता. बिबट्या पकडल्याने श्रीरामपूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर वन विभागासह पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे नागरीकांनी कौतुक केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version