अहमदनगर प्रतिनिधी –
अहमदनगर महानगर पालिकेच्या जागेवर बांधलेल्या झारेकर गल्ली परिसरातील सार्वजनिक शौचालय शनिवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी पाडून टाकून महापालिकेचे मोठे नुकसान केले आहे . ही घटना सकाळी या परिसरातील लोकांच्या समोर आली. मात्र याबाबत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी शौचालय असून या परिसरातील नागरिक या शौचालयांचा वापर करत होते. मात्र अचानक पणे रात्रीतून हे बांधकाम पाडल्याने यामागे वेगळाच वास येऊ लागला आहे.
या प्रकरणी आता महापालिकेच्या वतीने कोतवाली पोलिस ठाण्यात महापालिकेचे सुपरवायझर ज्ञानेश्वर शिवाजी झरेकर यांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादीत चार लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या आधीही महापालिकेचे शौचालय असतील अथवा भाजी बाजार असेल ते सुद्धा असेच रात्रीतून अज्ञात लोकांनी पाडलेल्या घटना नगर शहरात घडल्या आहेत. तेव्हाही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अद्याप पर्यंत त्या ज्ञात लोकं कोणालाच सापडलेली नाहीत. मात्र अनेक ठिकाणी सध्या महानगरपालिकेच्या जागेवर कब्जा करून पत्राचे शेड ठोकून अतिक्रमण करून व्यवसाय उभारण्याचा सपाटा शहरात चालू आहे याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे