Home विशेष चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई महापालिकेने बजावल्या मांजा विक्री करणाऱ्या...

चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई महापालिकेने बजावल्या मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा

अहमदनगर दि.१२ जानेवारी

मकर संक्रांत जवळ आली असून मकर संक्रातील पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी शहरात ठीक ठिकाणी पतंग मांजा विक्रीचे दुकाने थाटली आहेत मात्र काही दुकानदार बंदी असलेल्या चायना मांजा विक्री करत आहेत.

या मांजा मुळे नागरिकांना गंभीर ईजा होते तर पशुपक्षांचा जीव जातो त्या मुळे या चायना मांजवर कायदेशीर बंदी घालण्यात आली असली तरी चोरी छुपे या मांजाची विक्री सुरूच आहेत.

ही बाब निदर्शनास आल्याने महापालिकेच्या प्रभाग समितीच्या वतीने बागडपट्टी परिसरात पतंग मांजा विक्री करणाऱ्या व्यवसिकांना नोटीसा बाजवण्यात आल्या असून जर चायना मांजा विक्री करताना अथवा साठवणूक करण्यात आला असल्याचे आढळून आल्यास त्या विक्रेत्यावर दंडात्मक करवाईसह फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची नोटिसा महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य स्वछता निरीक्षक एन टी भांगरे, स्वछता निरीक्षक प्रशांत रामदिन यांनी या नोटिसा बाजवल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version