Home विशेष ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या ‘या’ विद्यार्थ्यांच्या मागणीने...

ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या ‘या’ विद्यार्थ्यांच्या मागणीने उडाली एकच खळबळ

नांदेड दि १२ जानेवारी
कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. लॉकडाऊन मुळे अनेक दिवस शाळा आणि कॉलेज बंद होते तर काही दिवसानंतर शासनाने ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि कॉलेज तसेच कोचिंग क्लास सुरू करण्यास संमती दिली होती. मात्र या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असून ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे.

राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा, असे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

कोरोना संसर्ग वाढला तर याचा पहिला फटका शिक्षणावरच बसतोय कारण हॉटेल आणि दारू दुकाने यांना प्रशासन उघडे ठेवण्यास परवानगी देते मात्र शाळा महाविद्यालय लगेच बंद करण्यात येतात त्यामुळे जनताही या प्रकाराला आता कंटाळली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version