Home जिल्हा जातीयवाद, धार्मिकवादाला नका देऊ थारा! माणूस म्हणून जगू हाच नवा नारा! धार्मिक...

जातीयवाद, धार्मिकवादाला नका देऊ थारा! माणूस म्हणून जगू हाच नवा नारा! धार्मिक सलोखा राखण्यासाठी राहुरी पोलिसांच्या या उपक्रमाचे होतेय कौतुक

अहमदनगर दि .६ एप्रिल
सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून विविध राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडताना जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या मुळे ठिकठिकाणी परिस्थिती बदलत चालली असून याचा ताण पोलीस दलावर जास्त पडतोय

हा जातीयवाद धार्मिक वाद माणूस जिवंत असे पर्यंत असतो माणसाचे निधन झाल्यावर सर्वाना सारख्याच पद्धतीने अंतविधी करावा लागते फरक एवढाच असतो विविध धर्मा नुसार विधी केला जातो

हाडांमांसाने तयार झालेले मानवी शरीर असते ते सर्वनाचेच सारखे असते फक्त माणूस या शरीराला आपापल्या पद्धतीने धार्मिक रंग देतो

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि सध्याचे वातावरण पाहून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी एक चांगली संकल्पना अमलात आणली असून विविध मानवी कवट्यांच्या खाली धर्म लिहले आहेत आणि आपण सर्व एकच आहोत हे सांगण्याचा प्रयत्न एका भित्ती पत्रकाद्वारे करण्यात आला आहे .

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, यांच्या प्रेरणेने आणि राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या संकल्पनेतून हे भित्तीपत्रकाने आकार घेतलाय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version