अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय आगी प्रकरणात निलंबित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाात त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे अर्जावर पोलिसांचे म्हणणे न्यायालयाने मागवला आहे या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे मात्र याबाबतची सुनावणी अद्याप झालेली नाही या प्रकरणात पोलिसांनी पाच दिवसांचा अवधी मागितला होता