Home क्राईम जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणातील महत्वाचा मुख्य विद्युत निरीक्षक यांचा अहवाल चौकशी समितीच्या...

जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणातील महत्वाचा मुख्य विद्युत निरीक्षक यांचा अहवाल चौकशी समितीच्या हाती, पोलीस मात्र अजूनही अवहालाच्या प्रतीक्षेत

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता बीड कशाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर या संदर्भात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती नेमली आहे. सध्या ही समिती विविध विभागांची चौकशी करत आहे ही नेमकी कशामुळे लागली याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना आग ही शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या या प्रकरणातील तपासही ही आग कशा मुळे आणि कोणाच्या हलगर्जीपणामुळे लागली या प्रश्ना वर येऊन थांबला होता. त्यामुळे याबाबत मुंबई येथील मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या आवहालाची प्रतीक्षा पोलिसांना होती. हा अहवाल मंगळवारपर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचले असा अंदाज होता मात्र हा अहवाल पोलिसांना न देता थेट विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या चौकशी समितीला सादर केल्याचं मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी सांगितले त्यामुळे आता पोलिसांसमोर या तपासाबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहे या प्रकरणातील तपासी अधिकारी उपाधीक्षक संदीप मिटके यांनी मुख्य विद्युत निरीक्षक यांना दोन वेळा स्मरण पत्र पाठवून अहवालाबाबत विचारणा केली होती.मात्र विद्युत विभागाने पोलिसांना अहवाल न पाठवता थेट चौकशी समितीकडे अहवाल पाठवल्याने आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version