मध्यप्रदेश मधील भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या वॉर्डला आग लागली असून या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि मदतकार्य सुरू झालेले असून या रुग्णालयात किती मुले उपचार घेत होते आणि कुणाला काही इजा झाली का याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही
मात्र सर्वात मोठ्या लहान मुलांच्या सरकारी हॉस्पिटल ला आग लागल्याने पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे आग लागल्याने हॉस्पिटल मधील पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची पळापळ झाल्याने हे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या नंतर लगेच भोपाळला ही आग लागल्याने सरकारी हॉस्पिटल च्या बेजबाबदारपणा बद्दल प्रश्न चिन्ह उभे राहत आहेत