अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगी संदर्भात निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी न्यायालयात धाव घेत अंतरिम अटकपूर्व जामीन येण्यासाठी अर्ज दाखल केला होता काही अटींवर न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. याबाबत आज अंतिम निर्णय होणार होता.या प्रकरणात पोलिसांनी आज अर्ज देऊन पाच दिवसांची मुदत मागितली असून आता डॉक्टर पोखरणा यांच्या अंतरीम अटकपूर्व जमिनी बाबत आता पाच दिवसांनी होऊ शकतो.