अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय सहा नोव्हेंबर रोजी आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत याप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत पोलिसांचा तपास थंडावला होता कारण विद्युत विभागाकडून जो अहवाल येणार होता त्यावर हा तपास पुढे सरकणार होता. मात्र हा अहवाल अद्याप पर्यंत अहमदनगर पोलिसांना मिळाला नसल्याने सध्या तरी तपास थंडावला आहे याबाबत पोलिसांनी दोन पत्र पाठवून अहवाल लवकर मिळावा अशी मागणी केली आहे यावर मुंबईतील मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी हा अहवाल मंगळवारपर्यंत पोलिसांनी पर्यंत पोहोचेल अशी माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिस तपास वेगाने सुरू होईल आणि पोलिस या घटनेस कोण जबाबदार आहे याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास या अहवालाची मदत होणार आहे