Home विशेष डीवायएसपी संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर, पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तिपत्र...

डीवायएसपी संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर, पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तिपत्र आणि २५ हजार रुपये रोख बक्षीस

अहमदनगर दि.१९ जानेवारी

श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये देण्यात आले आहे.

संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34, पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता. या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले आहे.

रोजी नगर शहरातील भराड गल्ली या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होती या गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता. प्रथम या गुन्ह्याचा तपास पीएसआय विशाल सणस यांच्याकडे होता या. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास शहर उपअधिक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.मात्र मुलगी अत्यंत लहान असल्याने आरोपी शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सर्व आव्हान पेलत पोलिसांनी तपास जलद गतीने तपास  करत या प्रकरणातील अत्याचार करणारा तरुण आणि त्याला साथ देणारी त्याची आई या दोघांना अटक केली होती.

डीवायएसपी संदीप मिटके यांनी  या गुन्ह्याचा तपास  पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि 20 वर्षे सश्रम कारावास व ५००००रु दंड आणि दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी मुन्नी उर्फ शमीना सय्यद हिला बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे 17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके आणि त्यांचे पथकातील परिविक्षाधीन Dysp पुनम पाटील,PSIविशाल सणस, PSI जया तारडे, ASI भालसिंग, HC सुयोग सुपेकर, PC याकूब सय्यद आदींनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version