Home राजकारण आमदार निलेश लंके यांचा जोर का झटाका ‘या’ नगरसेवकाने केला राष्ट्रवादी मध्ये...

आमदार निलेश लंके यांचा जोर का झटाका ‘या’ नगरसेवकाने केला राष्ट्रवादी मध्ये प्रवेश,नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार – आमदार निलेश लंके

पारनेर दि. १९ जानेवारी

नगर पंचायतीच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड कडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पारनेर पारनेर नगरपंचायतिच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.पारनेर नगर पंचायती मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अपक्ष पारनेर शहर विकास आघाडी असे पक्षीय बलाबल असून सत्तेची चावी अपक्ष आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या हातात गेली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके  यांनी पारनेर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीतच नगराध्यक्ष होईल असा चंग बांधला असून त्यादृष्टीने आता त्यांनी पुढची रणनीती आखण्यास सुरू केली आहे. नुकत्याच निवडून आलेल्या पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपंचायत मध्ये आठ सदस्य झाले आहेत.

पारनेर नगरपंचायतीचे वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी सर्व नवनिर्वाचित आलेल्या नगरसेवकांना दिला आहे त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकून एक नगरसेवक राष्ट्रवादी घेतला आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी ऍड.राहुल झावरे,चंद्रकांत चेडे,बबन चौरे,नितीन अडसूळ,
गणेश कावरे,बाळासाहेब मते, संजय वाघमारे, डॉक्टर सादिक राजे,बाळासाहेब नगरे,अँड. ,सचिन नगरे,रायभान औटी,पोटघन मेजर,विजय औटी,सचिन औटी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version