Home राजकारण तुझे मिर्ची लागी तो…ने दिलं जातंय शिवसेना, काँग्रेस च्या टीकेला राष्ट्रवादी कडून...

तुझे मिर्ची लागी तो…ने दिलं जातंय शिवसेना, काँग्रेस च्या टीकेला राष्ट्रवादी कडून उत्तर ते स्टिकर होतंय चांगलंच व्हायरल

अहमदनगर दि.७ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सोहळ्याचा वाद थांबता थांबेना या कार्यक्रमा बद्दल शिवसेनेच्या अधिकृत फेसबूक पेज राष्ट्रवादीवर जोरदार टीका करण्यात आल्यानंतर सोमवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्यक्रमावर टीका करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा कार्यक्रम हायजॅक करून या कार्यक्रमात अश्लील गाणे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा थेट आरोप केला आहे. याबाबत आमदारांनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेस तर्फे करण्यात आली.

तर शहराच्या प्रथम महापौर रोहिणी शेंडगे यांना या कार्यक्रमासाठी एक तास ताटकळत ठेवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शिवसेना आणि काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर स्टिकर वायरल केली जात असून यामध्ये ‘तुझे मिरची लगी तो मै क्या करू’ आशा आशयाचे मिरचीचे स्टिकर सध्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून जोरदार व्हायरल होत आहे.

त्यामुळे शिवसेना, किंग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीकडून या स्टिकर दारे उत्तर देण्यात आल्याचे दिसून येत आहे तर सोशल मीडिया वर या कार्यक्रमाबाबत चांगलीच गरमागरम चर्चा होताना दिसते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version