संगमनेर दि १४ मार्च
मटका पेढी वर छाप्या साठी एक नव्हे दोन नव्हे तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक संगमनेरात दाखल झाल्याने या छाप्याची संगमनेरात जोरदार चर्चा सुरू आहे .
संगमनेर शहरातील अवैद्य धंद्याच्या जिरवा जिरवीतून शहरातील तेलीखुंट, नेहरु चौक, कासट संकुल, कुरण रोड केसेकर संकुलातील मटका पेढी, अकोले बायपास रस्त्यावरील मटका पेढ्यांवर आज छापे पडले स्थानिक पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एक पथक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नाशिकच्या पथकाने संगमनेरात घेऊन अचानक सात ठिकाणी कारवाई केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
नाशिक वरून विशेष पथक संगमनेर मध्ये अवैध धंद्यांवर छापा टाकण्यात साठी निघाल्याची खबर स्थानिक पोलिसांना कळताच आज स्थानिक पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापे टाकले तर हीच खबर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळताच त्यांनीही तातडीने संगमनेर मध्ये धाव घेऊन एका ठिकाणी छापा टाकून कारवाई केली तर विशेष पथकाने जुगारक्लब वर छापा टाकून आपली कामगिरी नोंदवली आहे.
त्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला असून एका दिवशी एवढ्या मोठ्या तीन टीमने संगमनेरातील छोटे-छोटे छापे टाकून कारवाई केली त्या बद्दल सामान्य संगमनेरकारांनी स्वागत केल आहे.