Home शहर हॉटेल सनी पॅलेस मध्ये चोरट्यांचा डल्ला सीसीटीवी मध्ये कैद झाला कसा पळवला...

हॉटेल सनी पॅलेस मध्ये चोरट्यांचा डल्ला सीसीटीवी मध्ये कैद झाला कसा पळवला गल्ला

अहमदनगर दि १४ मार्च
अहमदनगर शहरात दिवसान दिवस ोर्‍यांचे प्रमाण वाढत असून या चोऱ्या रोखणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.सोमवारी नगर शहरातील कापड बाजारातील काही व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज कुमार पाटील यांची भेट घेऊन बाजारपेठेतील भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली.

तर रविवारी रात्री नगर औरंगाबाद रोड वरील हॉटेल सनी पॅलेस या ठिकाणी चोरट्यांनी शटर तोडून हॉटेल मध्ये प्रवेश करत काउंटर मधील गल्ल्यातील काही रक्कम चोरून नेली आहे. तर हॉटेलमध्ये झोपणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची पगाराची रक्कम ही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे.

मात्र शहरात दिवसेंदिवस चोरी घरफोड्या आणि भुरट्या चोरांचा प्रमाण वाढले आहे त्यामुळे आता या चोऱ्या रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version