Home शहर त्या ताबा मारणाऱ्या ‘स्वप्ना’ मुळे सर्वसामान्य माणसाला आपली जमीन विकावी लागली कवडीमोल...

त्या ताबा मारणाऱ्या ‘स्वप्ना’ मुळे सर्वसामान्य माणसाला आपली जमीन विकावी लागली कवडीमोल भावाने, खोटे मालक उभा करून राजकीय पुढाऱ्याने विकली नामांकीत व्यक्तीला परस्पर जमीन

अहमदनगर दि.२७ मार्च
ताबा हे सदर चालू केल्यापासून अनेकांची पळता भुई थोडी झाली आहे तर अनेक सामान्य नागरिकांना बळ मिळाले आहे. अनेक ताबा मानणारे गुंड सध्या पुढे नेमके काय घडते याचा अंदाज घेण्यासाठी शांत असले तरी काही सराईत गुंडांनी ताबा मारण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.

ताबा हे सदर चालू झाल्यापासून अनेकांनी आमच्याशी संपर्क करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतची कहाणी कथन केली आहे मात्र याबाबत कायदेशीर कारवाई योग्य ठरू शकते आणि कायदेशीर कारवाई मुळेच हे गुंड थांबू शकतात त्यामुळे ताबा मारणाऱ्या गुंडांच्या विरोधात तात्काळ पोलीसांकडे जा हीच आम्ही सर्वसामान्य नागरिकांना विनंती केली आहे.

तपोवन रोड परिसरात काही गुंडांनी सध्या धुमाकूळ घातला असून एका सर्वसामान्य नागरिकाची तपोवन रोड वरील रस्त्याच्या कडेला असलेली जमीन एका “स्वप्नातल्या ताबा गुंडानेहडप केली आहे. अनेक दिवस या गुंडाच्या विरोधात सर्व सामान्य माणसाने लढाई केली मात्र अखेरीस त्या सर्वसामान्य माणसाला ही जागा कवडीमोल दराने दुसऱ्याला विकून टाकावी लागली आहे स्वकष्टाने पुढील भवितव्यासाठी खरेदी केलेली जमीन या सराईत ताबा मारणाऱ्या गुंडा मुळे विकावे लागल्याची घटना तपोवन रोडला ताजी आहे.

तर दुसर्‍या घटनेत एका राजकीय पुढाऱ्याने शहरातील एका नामांकीत व्यक्तीला फसवले असल्याची घटना समोर आली आहे.लाखो रुपयांची जमीन परस्पर खोटे मालक उभा करून साठेखत करून मोठी रक्कम राजकीय पुढाऱ्याने नामांकीत व्यक्ती कडून घेतली मात्र जेव्हा जमीन खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा सर्व सत्य समोर आले जमिनीच्या मूळ मालकाला आपली जमीन परस्पर खोटे कागदपत्र आणि खोट्या व्यक्ती उभा करून जमीन विकल्याच समोर येताच धक्का बसला आहे तर घेणारा नामांकीत व्यक्ती आता त्या पुढाऱ्याला शोधत आहे मात्र ती पुढारी सध्या स्विच ऑफ आहे या बाबत आता पोलीस कारवाई होण्याची श्याक्यात आहे.

खोटे मालक उभा करून जमीन विकणे अशा घटना नगर शहरात मध्ये नवीन नाहीत या आधी एका डॉक्टरची अशीच मोठी फसवणूक झाली होती तो डॉक्टर अमेरिकेत असताना त्याची जमीन परस्पर काही लोकांनी एका राजकीय पुढाऱ्याला विकल्याची घटना घडली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version