Home शहर रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

अहिल्यानगर दिनांक 18 जून

३० नोव्हेंबर २०२० रोजी नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी देण्यात आली होती. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते. या खून प्रकरणानंतर या प्रकरणाच्या निगडित असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजु शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे.

यामधील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे ययास उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथून आज तात्पुरत्या स्वरुपाचा जामिन मंजूर करण्यात आला आहे. सागर भिंगारदिवे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथीलअॅडव्होकेट सुनिता सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version