Home राजकारण धनंजय मुंडे यांची बिडी तर निलेश राणे यांची सीडी माजी मंत्री एकनाथ...

धनंजय मुंडे यांची बिडी तर निलेश राणे यांची सीडी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कडे असलेली सीडी तर बाहेर आलीच नाही आता निलेश राणेंकडे कोणती आहे ती खाजगी सीडी

मुंबई दि ८ मार्च
महराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगला आहे तर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा दुसरा सामना महाराष्ट्रात सुरू आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक , नितेश राणे अटक , आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल, अशा अनेक प्रकरणात महाविकास आघाडीवर आरोप होत आहेत. तर दुसरीकडे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना झालेल्या अटकेवरून आणि इतर नेत्यांच्या चौकशीवरू केंद्रावर आरोप होत आहेत.

काल धनंजय मुंडे यांनी बोलताना ईडीची किंमत शेतकऱ्यांच्या खिशातल्या विडीसारखी झालीय, अशी टीका भाजवर केली होती.त्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विट करता उत्तर दिले असून आता तुमची पर्सनल सीडी बाहेर आली तर वांदे होतील असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version