अहमदनगर दि.५ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्हयामध्ये चैन स्नॅचिंगचे प्रकार मागील महिन्यात खूप वाढले होते या बाबत स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती एकट्या महिला गाठून दुचाकीवर भरदाव वेगात चोरी करून चोरटे पळून जात असल्याने त्यांना शोधणे पोलिसांन समोर एक अवहानच असते.
मात्र या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत आशा गुन्हेगारीची पाळे मुळे शोधून काढण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, विश्वास बेरड, संदिप पवार, भाऊसाहेब कुरुंद, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार पोकॉ/सागर ससाणे, रोहित यमुल, आकाश काळे, योगेश सातपुते व चापोहेकॉ/ चंद्रकांत कुसळकर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खास टीम स्थापन करून आरोपींचा शोध घेण्याबाबत कामगिरी सोपवली होती.
धूम स्टाईल ने चोरी करणाऱ्या टोळीचा तपास करत असताना या टीमला मिळालेल्या माहिती नुसार श्रीरामपूर येथील अशोक नगर भागातील विशाल बालाजी भोसले हा त्याच्या साथीदारांनी चैन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावुन श्रीरामपुर येथिल गांधी चौक या ठिकणी विशाल बालाजी भोसले, याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याच्या झडती मध्ये कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड मिळुन आल्या त्याची किंमत सुमारे ७,६५,००० रुपये इतकी होती.त्या बाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सांगीतले की सदरचे सोने हे वडाळामहादेव येथील संदिप दादाहरी काळे, नाशिक येथील लहु बबलु काळे योगेश ,सिताराम पाटेकर यांनी मिळून अहमदनगर शहर, संगमनेर व नाशिक येथून मोटार सायकवरुन जाऊन तेथील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढुन चोरुन आणले आहेत आता हे दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
त्या नुसार पोलिसांनी त्याच्या माहितीच्या आधारे त्याचे साथीदार संदिप दादाहरी काळे, (वय ३२ वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याचा वडाळा महादेव परिसरात त्यास ताब्यात घेतले तसेच त्यांना या गुन्ह्यात मदत करणारे आणखीन दोन आरोपी यांचा शोध घेतला मात्र नाशिक येथील लहु बबलु काळे आणि योगेश सिताराम पाटेकर हे दोघे फरार झाले आहेत या आरोपी विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत करणे असेगंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
> आरोपी नामे संदिप दादाहरी काळे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, (एकुण दाखल गुन्हे -०४)
१) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं. २९३/२०२१ भादंवि क. ३९२,३४
२) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं. ३००/२०२१ भादंवि क. ३९२,३४
३) राहता पो.स्टे. गुरनं. २३९/२०२१ भादंवि क. ३९२,३४
४) लोणी पो.स्टे. गुरनं. ३७६/२०२१ भादंवि क. ३९२,३४
> आरोपी नामे लहु बबलु काळे (फरार) रा. पळसे कारखाना, ता. जि. नाशिक (एकुण दाखल गुन्हे -०९)
१) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं. २९३/२०२१ भादंवि क. ३९२,३४
२) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं. ३००/२०२१ भादंवि क. ३९२,३४
३) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं. ५७१/२०१७ भादंवि क. ३९२, ४११, ३४
४) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं. १८९/२०२१ भादंवि क. ३२४, ३२३, ५०४, ५०६
५) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं. १९/२०२१ भादंवि क. ३८०
६) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं. २/२०२१ म.पो.का. १२२
७) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं. २९४/२०२० भादंवि क. ३९२
८) सिन्नर पो.स्टे. जिल्हा नाशिक गुरनं. १०५०/२०२१ भादंवि क. ३९२, ३४
९) सिन्नर पो.स्टे. जिल्हा नाशिक गुरनं. १०९३/२०२१ भादंवि क. ३९२, ३४
> आरोपी नामे योगेश सिताराम पटेकर (फरार) रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर (एकुण दाखल गुन्हे -०४)
१) श्रीरामपूर तालुका पो.स्टे. गुरनं. १७०/२०२० भादंवि क. ३९४, ४२७, ३४
२) नेवासा पो.स्टे. गुरनं. ७००/२०२० भादंवि क. ३९५, ३९७ सह आर्म अॅक्ट ४/२५
३) सिन्नर पो.स्टे. जिल्हा नाशिक गुरनं. १०५०/२०२१ भादंवि क. ३९२, ३४
४) सिन्नर पो.स्टे. जिल्हा नाशिक गुरनं. १०९३/२०२१ भादंवि क. ३९२, ३४
सर्व आरोपी व मुद्देमाल भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या नंतर . पुढील कारवाई
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,मनोज पाटील, अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल स्वाती भोर,नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे,श्रीरामपूर विभागउपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,संगसमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.