Home क्राईम नगर फाईल्स…एकच फाईल आली समोर …. अभी तो पिक्चर बाकी है…

नगर फाईल्स…एकच फाईल आली समोर …. अभी तो पिक्चर बाकी है…

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 22 फेब्रुवारी

विकृत माणसाचा कळस’ ही संकल्पना सुसंस्कृततेचा मुखवटा घालून वावरणारे पण आतून अत्यंत विकृत, विवेक हरवलेले आणि अनैतिक कृत्य करणारे लोक आपल्या सुखासाठी काहीही करू शकतात . असाच एक प्रकार नगर शहरात घडला असून सभ्य चेहऱ्यामागे विकृतीचा खरा चेहरा एका व्हिडिओ द्वारे समोर आला आहे.

Oplus_0

अहिल्यानगर शहरात सकाळ पासूनच सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून अनेकांनी हा किळसवाणा प्रकाराचा निषेध केला आहे.अत्यंत घाणेरडे व्हिडिओ पाहून अनेकांनी नाके मुरडली असली तरी हा प्रकार अत्यंत धक्कादायक असाच म्हणावा लागेल पोलिस या प्रकरणाचा तपास करून सत्य ते बाहेर आणतीलच मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने ही गोष्ट करणे म्हणजे राजकारणात येणाऱ्या महिलांना राजकारणात ही धोक्याची घंटा म्हणता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष माझी महापौर शिक्षण संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असे विविध पदे असताना एखाद्या राजकीय माणसाने असे कृत्य करणे म्हणजे लोकांचा हा विश्वासघातच म्हणता येईल. कारण राजकारण म्हटलं की त्यामध्ये स्त्री आणि पुरुष सगळ्यांचा सहभाग असतो मात्र असे विकृत लोक जर पदाधिकारी असतील तर त्या महिलांना त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

शिरूरच्या त्या पिडितेला नोकरीचे आम्ही दाखवून वेळोवेळी लॉजवर तसेच व्हिडिओ कॉल करून असली चाळे करणाऱ्या अभिषेक स्वतःसह नगरच्या अब्रूचे लक्तरे वेशीला टांगले आहेत. जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये चाळे पाहून हा माणूस किती विकृत आहे हे निदर्शनास येते त्यामुळे अजून कोणी महिला या विकृत माणसाच्या वासनेला बळी पडले नाहीत ना असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

विकृत माणसाला काही कळत नाही असेच म्हणावे लागेल आपले घर आपले ऑफिस आपला परिसर सर्व ठिकाणी हा सावज शोधत असतो असेच या व्हिडिओ मधून दिसून आले आहे.
या प्रकरणी आता राजकीय वातावरण पेटले असून सर्व बाजूंनी टीका सुरू झाली.भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी आपल्या X हँडलवरून या प्रकरणावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
त्या लिहतात

महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच… पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही* अहिल्यानगरमधील शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकर ने जे काळं कृत्य केलं त्याला माफी नाही… त्याला कायद्यानुसार शिक्षा होईलच…. पण आज माझा थेट प्रश्न १२मतीच्या मोठठ्या ताई ना आहे महिलांच्या सन्मानावर मोठमोठी भाषणं करणाऱ्या आज गप्प का…? त्या नराधमाला तुमच्या पक्षातून तात्काळ बडतर्फ करणार नाही का? लक्षात ठेवा … मौन हे देखील सहकार्यासारखंच असतं… हा फक्त एका मुलीचा प्रश्न नाही… हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे..

आज एकच व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी विकृत माणूस काहीही करू शकतो त्यामुळे त्याच्या मोबाईल मधून अनेक व्हिडिओ बाहेरू शकतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ एकच असेल अजून काही व्हिडिओ बाहेर येतील का? हे आता पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे.

आज अभिषेक वर अत्याचाराचा गुन्हा अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असला तरी असे अनेक विकृत लोक आजही राजकारणात असतील तर महिला राजकारणात खरंच सुरक्षित आहे का हा सवाल अनुत्तरितच राहतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version