अहमदनगर दि ५ मार्च
२२ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगरच्या कब्बडी संघाने खुल्या गटातील अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवत अहमदनगरच्या इतिहासात कबड्डी संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
भिवंडी येथे नुकतीच ६९ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पार पडली गुरुवारी या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई शहर विरुद्ध अहमदनगर यांच्या मध्ये झाला या अटीतटीच्या सामन्यात नगरच्या संघाने मुंबईच्या संघावर गोल्डन रेड च्या माध्यमातून माता करत विजेतेपद पटकावले.
या सामन्यात सुरवातीला बरोबरी झाली होती त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत अली होती भरगच्च प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानावर टेंशनच वातावरण होत क्षणा क्षणाला बाजी पालटत होती. मात्र नगर संघाचा कर्णधार शरद गदई याने गोल्डन रेड मध्ये बोनस गुण मिळवत विजेतेपद नगरच्या नावावर कोरले.संघाला प्रोत्साहान देण्यासाठी नगर जिल्हा संघटनेचे सहसचिव विजय मिस्किन, सुनील जाधव,राजेश काळे आदी सह काही खेळाडू उपस्थित होते.
२२ वर्षा पूर्वी नगरचे सुपुत्र आणि सध्या मीरा भायदंर येथे सहह्याक उपयुक्त असलेले पंकज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे झालेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते मात्र दोन गुणांनी विजेतेपद हुकले होते तेव्हा पासून आजनपर्यंत नागरकरांचे स्वप्न अधुरे होते ते स्वप्न नगर संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू शंतनू पांडव यांनी पूर्ण केले आहे.
कारण पंकज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघात शंतनू पांडव यांचाही सहभाग होता. आता जरी ते प्रत्यक्ष खेळात सहभागी झाले नसले तरी त्यांनी बावीस वर्षांचे स्वप्न आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
नगरच्या विजेत्या संघात संघात शंकर गदई (कप्तान), राहुल धनवटे, राहुल खाटीक, राम अडागळे, देविदास जगताप, संभाजी वाबळे, प्रफुल झावरे यांच्यासह
राहुल आगळे, आदित्य शिंदे, अजित पवार, अजिंक्य जीवरक व प्रेम खुरंगे यांचा समावेश होता तर संघ व्यवस्थापक म्हणून सतीश मोरकर होते.
नगरच्या संघाने मुंबई उपनगर, कोल्हापूर,औरंगाबाद,सोलापूर नंदुरबार, संघांना पराभूत केले. स्पर्धेत २५ जिल्हा संघ सहभागी झाले होते.