Home जिल्हा नाशिक येथील नॅशनल स्पोर्ट्स अँड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जिल्हा पोलिस दलातील महिला कर्मचारी...

नाशिक येथील नॅशनल स्पोर्ट्स अँड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जिल्हा पोलिस दलातील महिला कर्मचारी अर्चना काळे यांनी पटकावले रौप्यपदक

अहमदनगर प्रतिनिधी

नाशिक येथील वेट अँड रन तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल स्पोर्ट्स अँड एम चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी अर्चना काळे यांनी यश मिळवले असून शंभर, दोनशे आणि चारशे मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक हस्तगत केले आहे. नाशिक येथे ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारता मधून दीड हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचारी अर्चना काळे यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच शहर उपाधिक्षक संदीप मिटके यांनी अभिनंदन केले आहे पोलीस पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना खेळाचा छंद जोपासून रौप्यपदका पर्यंत मजल मारणे म्हणजे नक्कीच एक कौतुकास्पद बाब आहे.

शहरातील विविध क्रीडा संघटनांनी ही अर्चना काळे यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे एक महिला पोलीस कर्मचारी असताना कामाची जबाबदारी सांभाळून खेळामध्ये यश कमावणे ही पोलिस दलाला मान उंच करणारी घटना आहे. जिल्हा पोलिस दलाअंतर्गत घेण्यात येत असलेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक स्पर्धेत त्यांनी विविध पारितोषिके मिळवली आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version