Home विशेष शहर वाहतूक शाखेच्या हवलदार पुष्पा सोनवणे यांचा ट्रिपल धमाका थाळीफेक भालाफेक गोळाफेकमध्ये...

शहर वाहतूक शाखेच्या हवलदार पुष्पा सोनवणे यांचा ट्रिपल धमाका थाळीफेक भालाफेक गोळाफेकमध्ये पटकावले पदके चॅम्पियनशिप स्पर्धेत पाडली वेगळीच छाप

अहमदनगर प्रतिनिधी

नाशिक येथील वेट अँड रन तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल स्पोर्ट्स अँड एम चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये अहमदनगर पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांनी भला फेक , थाळी फेक ,आणि गोळा फेक या तीन स्पर्धेत यश मिळवले भला फेक आणि थाळी फेक मध्ये प्रथम तर गोळा फेक स्पर्धे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून या चॅम्पियन स्पर्धेत आपली छाप पाडली. पुष्पा सोनवणे या कर्तव्यावर असताना चांगल्या कामगिरीने पोलीस दलात ओळखीच्या आहेत. मात्र एकाच लीग मध्ये तीन स्पर्धेत सहभाग नोंदवून त्यांनी तीन बक्षिसे पटकावली आपल्या खेळाचे हे चुणूक दाखवून दिले आहे त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच शहर उपाधिक्षक संदीप मिटके यांनी अभिनंदन केले आहे.

नाशिक येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये भारतातील विविध राज्यांमधील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता वयाच्या ९९ वर्षापर्यंत खेळाडूंनी सहभाग नोंदवून खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version