Home शहर नो बॉल वरून दाणेडबऱ्यात क्रिकेट खेळणाऱ्या दोन संघात राडा

नो बॉल वरून दाणेडबऱ्यात क्रिकेट खेळणाऱ्या दोन संघात राडा

अहमदनगर दि १३ मार्च
अहमदनगर शहरातील दाणेडबरा या ठिकाणी क्रिकेट मधील नो बॉल टाकण्याच्या निर्णया वरून दोन संघात चांगलाच राडा झाला त्यामुळे काही काळ या ठिकणी तणाव निर्माण झाला होता घटना कळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ धाव घेतली होती.


क्रिकेट खेळणारी मुले अल्पवयीन असल्याचं समजले असून काही तरुण मुलेही या राड्यात सामील असल्याचं समजतंय.


एका संघाच्या गोलंदाजाकडून नोबॉल पडल्याच्या कारणावरून प्रथम बाचाबाची आणि नंतर दगडफेक झाल्याचा प्रकार झाला यात एक  तरुण जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या राज्यांमध्ये काही दुचाकींची ही तोडफोड करण्यात आली आहे.

एका अयोजकाने एका क्रिकेट लीगचे आयोजन केले होते आणि दर रविवारी या ठिकणी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत होते इतर दिवशी दाणेडबऱ्यात चालायला जागा नसते मात्र रविवारी बाजार पेठ बंद असल्याने शुकशुकाट असतो त्यावेळी सामन्यांचे आयोजन करण्यात येत असते .

दाणेडबरा मध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावला असून या प्रकरणात अद्याप कोणी फिर्यादी आले नसल्याने पोलीस स्वतः फिर्यादीहोऊन गुन्हा दाखल करत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version