दिल्ली दि.२५ डिसेंबर
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनसंवाद साधला यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तीन जानेवारीपासून 15 ते अठरा वर्षे पर्यंतच्या वयोगटातल्या मुलांचे लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारीपासून बूस्टरडोस देण्यात येतील आणि वयोवृद्धांसाठी बूस्टर डोस आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल आहे. नागरिकांनी ओमायक्रोनला घाबरू नये. धोका वाढला असला तरी लसीकरण हा त्यावर उपाय आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं लहान मुलांच्या लसीकरणासाठी आम्ही आग्रही होतो आणि आरोग्यसेवकांना बूस्टर डोस देण्याची विनंती आम्ही केली होती या दोन्ही घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.