अहमदनगर
ओमोक्रोन मुळे सध्या जगभरात भितीचे वातावरण पसरले आहे. भारतातही ओमोक्रोनचे काही रुग्ण सापडले असून त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे या ठिकाणी रुग्ण आढळून आल्याने राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ज्या जिल्ह्यात परदेशातून नागरिक आले आहेत त्यांची नोंद घेऊन त्यांची चाचणी करून विलगीकरन करण्यासाचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने प्रशासन सध्या काम करत आहे मात्र प्रशासना समोर सध्या नवीन संकट उभे राहिले असून अहमदनगर जिल्ह्यात ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युके, सौदी अरेबिया या ठिकाणाहून एकूण ५५ नागरीक अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र सध्या त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासन समोर एक मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. प्रशासन सध्या या परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेत आहे