Home जिल्हा श्रीरामपूर येथे बिबट्या पकडत असताना जखमी झालेल्या वनक्षेत्रपालाचा उपचारादरम्यान मृत्यू

श्रीरामपूर येथे बिबट्या पकडत असताना जखमी झालेल्या वनक्षेत्रपालाचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर
श्रीरामपूर शहरा मध्ये पाच डिसेंबर रोजी बिबट्याने थेट शहरात बसून धुमाकूळ घातला होता. सुमारे दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक नागरीकांचे सहाय्याने बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. मात्र बिबट्याला पकडत असताना राहुरी वनविभागाचे वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडिओ चांगला झाला होता बिबट्याने थेट किनकर त्यांच्या मांडीला चावा घेतला होता किनकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे लक्ष्मण किनकर हे राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील रहिवासी होते त्यामुळे तहाराबाद येथे शोककळा पसरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version