Home विशेष पाथर्डी येथील शेतकऱ्याच्या कष्टचे झाले चीज एक मुलगी आणि दोन मुलं एकाचवेळी...

पाथर्डी येथील शेतकऱ्याच्या कष्टचे झाले चीज एक मुलगी आणि दोन मुलं एकाचवेळी झाले पोलीस भरती

पाथर्डी दि ५ फेब्रुवारी

पोलीस दलात एकाच वेळी तीन संख्ये भावंड भरती झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे.पाथर्डी तालुक्यातील माळेगाव येथील थोरात कुटुंबातील अरविंद दिलीप थोरात ,सागर दिलीप थोरात व कोमल दिलीप थोरात हे दोन भाऊ व एक बहीन असे तीन सख्खे भावंडे एकाचवेळी पोलीस दलात भरती झाले आहेत.

ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील हे तिघे पोलीस दलात भरतीसाठी निवडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.संघर्षातून या बहीण भावांनी अथक परिश्रम घेऊन हे यश संपादित केले.घरातील आई वडिलांची हालाकीची परिस्थिती अश्याही वातावरणात जिद्दीने आपला अभ्यास करून स्वतःच्या कर्तव्यत्वावर आपल्या आई वडिलांचे नाव कमवले आहे.

सरकारी सेवेत एकाच वेळी एकाच खात्यात एकाच पदावर सख्या तीन भावंडांची निवड होणे हे तसे मोठे यश आहे. अरविंद थोरात ,सागर थोरात यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली तर कोमल थोरात हिची पुणे लोहमार्ग पोलीस दलात निवड झाली असून तिने महिलांमध्ये तिसरा क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.या मुलांचे वडील दिलीप राघोजी थोरात हे शेत मजुरी करून आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालवत आहे.

स्वतःची शेती नाही काम धंदा नाही. म्हणून मूळ माळेगाव हे गाव ३० वर्षांपूर्वी सोडून त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत येथे शेत मजुरीचे काम सुरु केले.अत्यंत गरिबीत दिवस काढत पोटाला चिमटा घेत तीनही मुलांनी कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जांबुत येथे पूर्ण केले.

त्यानंतर मुंबई येथे झालेल्या सन २०१९ च्या महाराष्ट्र पोलीस भरतीत तीनही भावंडांची एकाच वेळी निवड झाली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.तिन्ही मुलांना शिक्षकांसाठी आई कल्पना वडिल दिलिप यांनी परिश्रम घेतले.अरविंद हा एम स्स्सी शिक्षण पूर्ण केले असून स्पर्धा परीक्षांच्या अजूनही परीक्षा देत आहे.यापेक्षाही पुढच्या पदावर जाऊन अधिकारी बनण्याची धडपड सुरु आहे.सागर आणि कोमल हे पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

आर्थिक परिथिती अभावी मला बारावी नंतर पुढील शिक्षण घेता आले नाही याची मला खंत आहे.मात्र माझ्या मुलांच्या शिक्षणात मी काहीही कमी पडू दिले नाही.मुलांना प्रत्येक वेळी प्रोत्साहन देत त्यांचा मागे खंबीर पणे उभा राहिलो. मुलांनी हि आमच्या कष्टाचे चीज केले.
दिलीप थोरात ,वडील

थोरात कुटुंबीय पूर्वीपासून शेत मजूर आहे.आता जे मुले पोलीस दलात निवडले गेले त्यांचे आजोबा आणि आजी ऊसतोड मजूर होते.त्यानंतर आई वडिलांनी हि शेतमजुरीचे काम केले.एकाच वेळी तीन सख्ये भावंड सरकारी सेवेत जात आहे हे यश विशेष असे आहे.
जगदीश गाडे ,निवृत्त नायबतहसीलदार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version