Home जिल्हा पाथर्डी शहराचे ग्रामदैवत रामगीर बाबाची यात्रा मोठ्या उत्सवाने संपन्न

पाथर्डी शहराचे ग्रामदैवत रामगीर बाबाची यात्रा मोठ्या उत्सवाने संपन्न

पाथर्डी दि .५ एप्रिल
शहराच ग्रामदैवत असलेल्या रामगीर बाबाची यात्रा मोठ्या उत्सवाने संपन्न झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षेच्या प्रतीक्षेनंतर ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या दिवशी शहरातील सर्वच नागरिक सह परिवार रामगीर बाबाच्या दर्शन व यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि उचं टेकडीवर हे मंदिर असल्याने सर्वच भाविक या ठिकाणी रमतात.

रहाट पाळणे, विविध खेळ,खाऊ व खेळण्याच्या दुकानी बरोबर इतर वस्तू खरेदीसाठी दुकांना लावल्या जातात.यात्रेसाठी येणार नागरिक येथून खरेदी करून जातो. मंदिरा परिसरात विद्यूत रोषणाई केल्याने मंदिर परिसर आकर्षक दिसत होता .माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, प्रताप निऱ्हाळी व पंकज मुनोत यांच्या हस्ते रामगीर बाबांची विधिवत पूजा करण्यात आली.


सकाळ पासुन रामगीर बाबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. तर रात्री उशिरा पर्यंत शहरातील व परिसरातील नागरिक दर्शन घेतले.सर्व धार्मिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाले.प्रताप निऱ्हाळी परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.गावातील नागरिक कुटुंबासह यात्रेत येऊन लहान मुलांसाठी खेळण्या इतर खाद्य पदार्थ खरेदी करतात. हावरीची रेवडी,गुडीशेव,शेव -फरसाण अश्या पदार्थांना जास्त मागणी असते.

सुमारे तीनशे ववर्षा पूर्वी नाथ संप्रदायाचे साधू असलेले रामगीर बाबा व बोडखे बाबा हे पाथर्डी शहरात वास्तव्यात असलेली आख्यायीका आहे. मढी वरून रामगीर बाबा यांनी पाथर्डी शहरात वास्तव्यात करू लागले, नाथपंथी अनेक विद्या प्राप्त त्यांना होत्या ते मंत्राने धुनी पेटवत, बाबा घोड्यावर बसून संपूर्ण गावाची रात्री संरक्षण करत त्यांच्या समाधी नंतरही बाबांच्या अस्तितवाची प्रचीती आजही पांढरया शुभ्र घोड्यावर बाबांची स्वारी बघितल्याचे अनेकजण सांगतात.हिंदू रक्षा युवा मंचाच्या युवकांनी भजन संध्येचे आयोजन केले होते.

रात्री शहरातून रामगीर बाबांच्या पदूखाची पालखी मिरवणूक काढली जाते. यात्रा कमिटीचे प्रताप निऱ्हाळी,नंदकुमार डाळींबकर,संदेश बाहेती,डॉ जगदीश मुने,अतिश निऱ्हाळी,ओम भालसिंग,रामनाथ बंग,संजय गुरसाळी,सतीश निऱ्हाळी आदींनी यात्रेचे नियोजन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version