Home जिल्हा हुतात्मा चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उर्वरित लोकोपयोगी कामांसाठी खा.युवराज संभाजी महाराज छत्रपती...

हुतात्मा चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उर्वरित लोकोपयोगी कामांसाठी खा.युवराज संभाजी महाराज छत्रपती यांच्या निधीतून मिळणार तीस लाख रुपये

अहमदनगर दि.५ एप्रिल
अहमदनगर शहरातील रेसीडेन्सीयल महाविद्यालया समोरील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारक नूतनीकरणस्मायलिंग अस्मिता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले असून या नूतनीकरण कामाचे लोकार्पण मंगळवारी खा.युवराज संभाजी महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, पद्मश्री पोपटराव पवार यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आजचा हा कार्यक्रम म्हणजे योगा योग म्हणता येईल करण आज हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारक नूतनीकरणाचे लोकार्पण होत असताना त्यांची जयंती देखील आहे असे सांगत हुतात्मा चौथे शिवाजी महाराजांना इंग्रजांनी कसा त्रास दिला गेला इंग्रजांशी लढताना त्यांनी कशाप्रकारे चिवट झुंज दिली याचा उजाळा संभाजी महाराजांनी भाषणात बोलताना दिला.

तसेच खाजदारकीच्या या टर्मचा शेवटचा निधी अहमदनगर मधील स्मारकाच्या उर्वरित लोकोपयोगी कामांसाठी सुमारे तीस लाख रुपये निधी द्वारे देत असल्याची घोषणा युवराज संभाजी महाराज छत्रपती यांनी केली आहे.

अहमदनगरच्या किल्ल्यात इंग्रजांशी एकाकी झुंज देत हौतात्म्य पत्करलेल्या कोल्हापूरच्या हुतात्मा चौथ्या शिवाजी महाराजांची आज जयंती देखील आहे. महाराजांचे हे स्मारक भावी पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने लढण्याची नित्य प्रेरणा देत राहील त्यामुळे त्यांचे अहमदनगर मधील स्मारक प्रेरणादायी असल्याचे युवराज संभाजी महाराज छत्रपती यांनी सांगितलंय

स्मायलिंग अस्मिता फाऊंडेशनच्या तरुणांनी पुढाकार घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version