Home Uncategorized पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर गोळीबार

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर गोळीबार

पुणे दि.२७ डिसेंबर
अहमदनगर मध्ये आपल्या कामाने सिंघम म्हणून नाव कोरून गेलेले पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त हाती येत आहे.

एका खून प्रकरणातील सराईत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांनी गोळीबार केला. सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. या चकमकी मध्ये पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून योगेश जगताप नावाच्या तरूणाचा खून करण्यात आला होता.या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार-गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते. हे आरोपी एका ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना कळताच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या फौजफाट्यासह आरोपींना पकडण्यासाठी लपलेल्या ठिकाणी जाऊन घेराव घातला. पोलीस आल्याचं कळताच आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा गोळीबार सुमारे अर्धा तास सुरू होता अखेर आरोपींकडील दोन्ही पिस्तूलातील गोळ्या संपल्या. त्यानंतर गोळीबार शांत होताच पोलिसांनी लपून बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णप्रकाश यांनी काही तासांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट टाकत “मी ठीक आहे तुमच्या संपर्कात राहील जय हिंद”अशी पोस्ट टाकली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version