अहमदनगर दि .२४ मार्च
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सेल होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा दरवाढ सुरू झाली आहे आधीच महागाईने वैतागलेल्या नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे खिशाला आणखीन कात्री लागत आहे.
मात्र एक धक्कादायक बाब समोर आली असून नगर शहरात वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर वेगवेगळे दर आकारले जात आहेत नगरच्या भारत पेट्रोल पंपावर आज पेट्रोलचे दर १११.२५ पैसे इतका होता तर नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावर ११२.४७ पैसे इतका साधे पेट्रोलचा दर आहे या दोन्ही ठिकाणच्या दरा मध्ये जवळ जवळ १ रुपया बावीस पैशांची तफावत आहे.
तर डिझेल दरातही जवळपास एक रुपयांची तफावत आढळवून अली असून ९४.४ रुपये लिटर डिझेल भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप वर मिळत असताना नायरा पेट्रोल पंप वर ९५.०१ इतका दर आहे या मध्ये सुद्धा एक रुपयांची तफावत आढळून येतेय हे विशेष.