अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९(क) च्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकासआघाडी होणार का? याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. तर भाजप मध्ये सध्या तरी शांतता दिसून येत आहे.मात्र शिवसेना आणि काँग्रेस यांची एकत्रित बैठक होऊन या जागेवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस कडे सध्या पाच ते सहा उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मागील निवडणुकीचा इतिहास पाहता या जागेवर काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने शिवसेनेला प्रस्ताव दिला असून काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत तसेच मागील निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे प्रमुख दावेदार म्हणून काँग्रेस असेल असं शिवसेनेला दिलेल्या प्रस्तवात सांगितले आहे.तर राष्ट्रवादीबरोबर अद्याप कोणतीही बोलणी झाली नसून वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानंतरच महाविकास आघाडीबाबत चित्र स्पष्ट होईल असाही किरण काळे यांनी सांगितले आहे.