Home राजकारण प्रभाग क्रमांक ९च्या पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी, सट्टेबाजी जोरात

प्रभाग क्रमांक ९च्या पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी, सट्टेबाजी जोरात

अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी आज मतदान होत आहे सकाळपासून संथगतीने मतदान होत असतानाच दुपारी तीन नंतर काही मतदान केंद्रावर मतदान ची गर्दी वाढताना दिसून दिसून आली प्रभाग क्रमांक 9 साठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रदीप परदेशी महा विकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोपट पाथरे हे नशीब आजमावत आहेत.अपक्ष दोन उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे असून दुपारी दोन पर्यंत अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.

मात्र दुपारी तीन नंतर काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. महाविकास आघाडीचे सर्वच नेते विविध मतदान केंद्रावर उभे राहून मतदारांना आवहान करताना चित्र दिवसभर पाहायला मिळल. तर त्याउलट भाजपचे काही मोजकेच पदाधिकारी मतदान केंद्रा बाहेर उभे असल्याचे दिसून आले. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही मतदान केंद्रावर उपस्थिती लावली होती. प्रेमराज सारडा कॉलेज वर दुपारनंतर मतदारांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या पोलिसांनी या वेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी पाच नंतर ही काही ठिकाणी मतदान सुरू होते. कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता कसा निवडून येईल याबाबत अनेक काट्यांवर चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले तर काही ठिकाणी विजयी कोण होणार यावर सट्टा जोरात लागल्याचा समोर आलं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version