Home राजकारण मनसेचे पोपट पाथरे पायात चप्पल घालणार?त्या चक्रव्यूहामध्ये कोण अभिमन्यू होणार सर्वांच्या नजरा...

मनसेचे पोपट पाथरे पायात चप्पल घालणार?त्या चक्रव्यूहामध्ये कोण अभिमन्यू होणार सर्वांच्या नजरा उद्याच्या निकालाकडे

अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ क च्या पोटनीवडणुकीचे उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.पोटनिवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचा इतिहास असून या वेळेसही मतदानाची टक्केवारी फक्त ४४ इतकी असल्याने या निवडणुकीत सध्या तरी कोण निवडून येईल हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र ही निवडणूक तिरंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदीप परदेशी,महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी, आणि मनसेचे पोपट पाथरे यांच्या मध्ये ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की झाले आहे.पोपट पाथरे यांना या निवडणुकीत किती मतदान होते यावरच विजयी उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत.

पोपट पाथरे यांनी शपथ घेतली होती की जो पर्यंत निवडणूक जिंकून येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही त्यामुळे आता पोपट पाथरे यांचे स्वप्न पूर्ण होतंय का याकडेच सर्व कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. कमी टक्केवारी मुळे भाजप-शिवसेनेची धाकधूक वाढलेले आहे.दोन वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष नेत्यांनी एकत्र येत जे चक्रव्यूह आखले होते त्या चक्रव्यूहामध्ये
नेमका कोण अभिमन्यु होणार याकडेच आता प्रभाग क्रमांक 9 च्या मतदारांची नजर लागून आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version